कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याची मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आज आपला जाहीर नामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी जाहीर नाम्यातून केलेल्या घोषणा या खोट्या नसून आम्ही त्या खरच सत्यात उतरवणार आहोत असा देखील दावा केला. मात्र आता सत्ताधारी भाजपने या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचा जाहीरनाम म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने अशा स्वरूपाचा अशी बोचरी टीका केली आहे.

दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत काँग्रेस पक्षाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. कॉंग्रेसच्या या जाहीरनाम्याला हम निभाएंगे असे नाव देण्यात आले आहे.यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडू. ज्याप्रमाणे रेल्वेसाठी वेगळे अंदाजपत्रक आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांठीही असेल. त्यांच्यावर किती पैसे खर्च होत आहे हे शेतकऱ्यांनाही कळेल. तसेच शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास क्रिमिनल ऑफेन्स नसेल तर सिव्हील ऑफेन्स असेल, अशीही घोषणा राहुल गांधीनी जाहीरनाम्यात केली आहे.त्याच बरोबर अनेक विविध क्षेत्रातल्या घोषणा देखील केल्या आहेत. आमच्या जाहीरनाम्यात कोणतीच घोषणा खोटी नाही, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.

मात्र आता कॉंग्रेसने काढलेल्या जनहितकारी जाहीरनाम्यावर भाजप कडून टीकेची झोड उठवली जात आहे. कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे