आज मुंडे साहेबांची खूप आठवण येत आहे, कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री भावूक

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे स्वप्न साकार होणार असेल तर माझ्या आयुष्याची मी आहुतीही देईन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. तसेच गोपीनाथ मुंडे यांची आज आठवण येत आहे. अडचणीच्या काळात ते महत्वाची भूमिका घ्यायचे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आज असायला हवे होते, असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले.भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

होय माझ्याकडे दैवी शक्ती आहे. महाराष्ट्राचे नागरिक हेच माझे दैवी शक्ती आहेत. मला गमावण्यासाठी काही नाही. मला जनतेसाठी कमवायचे आहे. माझ्या आयुष्यात मी संस्था कारखाने स्वतःचे काढले नाही. मागच्या सरकारने जनतेचे काम न करता स्वतःचे कारखाने वाचविण्यात घालवला. संविधान, लोकशाहीच्या जोरावर कोणताही प्रश्न आपण सोडवू शकतो. मागच्या सरकारच्या काळात प्रश्न निर्माण झाले आणि त्याची आंदोलने आमच्या सरकारच्या काळात झाली. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, या कार्यकारणीच्या बैठकीला पंकजा मुंडे या अनुपस्थित होत्या. मुंडेंसह सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील कार्यकारिणीसाठी अनुपस्थित होते मात्र पंकजा मुंडे कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.