भीमा कोरेगाव घटनेची न्यायालयीन चौकशी करणार- मुख्यमंत्री

devendra-fadnavis

टीम महाराष्ट्र देशा: भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच कोणत्याही राजकीय नेत्यांनी आणखीन तणाव निर्माण होणारी वक्तव्ये करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

काल भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भिम अनुयायी आले होते. याच दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. यामध्ये अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तर यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान मृतांच्या परिवाराला 10 लाख रुपये मदतीची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. तसेच याची सीआयडी चौकशी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.