मंचावर या ! चार वर्षात काय केले ते सांगतो, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान

नगर : “शहर विकासासाठी राज्यात सर्व शहरे दत्तक घेण्यास तयार आहे. मात्र, दत्तक म्हटल्यावर काहींच्या पोटात दुखले जाते. पण टिकेला घाबरत नाही, चार वर्षात आम्ही काय केले व पंधरा वर्षात तुम्ही काय केले हे समोरासमोर सांगण्याची आमची तयारी आहे. तुम्ही मंचावर या असे” आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गांधी मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले हेाते. या वेळी ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री ?

“शहर विकासासाठी राज्यात सर्व शहरे दत्तक घेण्यास तयार आहे. मात्र, दत्तक म्हटल्यावर काहींच्या पोटात दुखले जाते. पण टिकेला घाबरत नाही, तुम्ही मंचावर या, चार वर्षात आम्ही काय केले व पंधरा वर्षात तुम्ही काय केले हे समोरासमोर सांगण्याची आमची तयारी आहे.