मुख्यमंत्र्यांचा नारा, आता बारामती जिंकायचीच !

पुणे : रावसाहेब दानवे यांनी 2014 पेक्षा एक जागा जास्त म्हणजे 43 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. ही 1 जागा बारामतीची असेल म्हणत, आता बारामती जिंकायचीच असा नारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मागील निवडणुकीत बारामती लोकसभेत कमळ चिन्ह असते तर काय चित्र असते हे सर्वांना माहीत आहे. यावेळी कमळ चिन्ह घेऊनच लढले जाईल, असंही फडणवीस म्हणाले.

स्वराजच्या इतिहासात अफजल खानाचा वध महत्वाचा आहे, एवढंच मर्यादित नसून खानाचा वध करण्यासाठी महाराजांनी केलेलं नियोजन महत्वाचं आहे. जावळीच्या खोऱ्यात खानाचे 42 हजार तर महाराजांचे 12 हजार मावळे होते. महाराजांनी सर्व मावळ्यांना जागोजागी नेमले होते. या मावळ्यांनी 42 हजारांच्या फौजेला हरवले. आजची लढाई ही मतांची आहे. आज अफजल खान नसला तरी तशा प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यांचा पराभव करायचा असल्याने नियोजन करणे गरजेचे असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Loading...

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी आज शक्तिकेंद्र प्रमुख, बुथकेंद्र प्रमुखांच्या बैठकीला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, खा. अनिल शिरोळे, खा. अमर साबळे यांच्यासह आमदार, पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, आज सर्व विरोधक भाजपला हरवण्यासाठी एकत्र येत आहेत, मात्र या सर्वांना पुन्हा एकदा मोदी सत्तेत आल्यास पुढील 50 वर्षे आपल्याला सत्ता मिळवता येणार नाही ही भीती आहे. त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन पंतप्रधान होण्यासाठी दिल्लीकडे जायला निघाले आहेत. परंतु यांचा नारा हा आवो चोरो बांदो भारा, आधा तुम्हाला आधा हमारा, अशी आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील