कर्जमाफी योजनेच्या व्याप्तीत वाढ

शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या व्याप्तीत वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केली. कर्जमाफीसाठीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आता २००९ नंतरच्या थकित कर्जदारांचा समावेश करण्यात आला आहे. या आधी शासनानं २०१२ नंतर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचाच या योजनेत समावेश केला होता. याशिवाय, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांवरील रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.