भौगोलिक परिस्थितीमुळे विमानतळाची जागा बदलली, आढळाराव पाटील यांच्यावर राजकीय आकसातून टीका

devendra fadanvis

शिक्रापूर: खेडमधील भौगोलिक परिस्थिती पाहता विमानतळ होणार नसतानाही कॉंग्रेस – राष्ट्रवादीने होणार असे सांगितले, तज्ञांचे आठ अहवाल आल्यावर विमानतळाची जागा बदलली गेली, मात्र विरोधकांकडून राजकीय आकसापोटी खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टीका केली जात आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. शिरूर लोकसभेचे शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिक्रापूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

बैलगाडा शर्यती कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये बंद करण्यात आल्या, पण सरकार म्हणून आम्ही आढळराव पाटील यांच्यासोबत आहोत, लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जनतेच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुणे नाशिक रेल्वे मार्गाला भाजप सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी हायस्पीड रेल्वेच्या साडेसात हजार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी लोकसभेच्या मैदानातून पळ काढत बारावा खेळाडू बनण्यात धन्यता मानली, याध्येच त्यांच्या पक्षाची काय अवस्था झाली हे समजते, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.