तुम्ही सवतीप्रमाणे वागले नसता तर राणेंना घेण्याची वेळच आली नसती

टीम महाराष्ट्र देशा : ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोखठोक प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस सडेतोड उत्तर दिले. यातच नारायण राणे यांचा प्रश्न नसता आला तर नवलच. संजय राऊत यांच्या नारायण राणे यांच्यावरील प्रश्नाला फडणवीस यांनी तितकच समर्पक उत्तर दिल आहे.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना नारायण राणे यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, युती झाली तर मी बाहेर पडेनं असा प्रश्न विचारला, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी ती मुलाखत पाहिली नाही. पण याचं तुम्ही आत्मपरिक्षण करायला पाहिजे. तुम्ही आमच्याशी जर सवतीप्रमाणे वागला नसता तर आम्हाला त्यांना घेण्याची वेळ आली नसती. त्यामुळे आता या मुलाखतीवर नारायण राणे कसा प्रहार करतात हे पाहण्यासारख असेल.