पवारांनी दुष्काळ आणि टंचाई असे शब्दछळ करू नये : मुख्यमंत्री

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या दुष्काळसदृश शब्दावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांच्या टीकेवर मुख्यमंत्र्यानी पलटवार केला आहे.’तुम्ही दुष्काळ म्हणा, महादुष्काळ म्हणा, आम्ही उपयोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे पवारांनी दुष्काळ आणि टंचाई असे शब्दछळ करू नये’,असा टोलाही मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना लगावला आहे.

तुमच्या काळात दुष्काळ शब्दच तुम्ही उडवून टंचाईसदृश्य शब्द ठेवला होता. तुम्ही सत्तेत होते तेव्हा, ‘दुष्काळ’ शब्दच नव्हता. मात्र आम्ही दुष्काळ शब्द वाढवून दुष्काळसदृश्य असे जाहीर केले आहे. शरद पवारांचा दुष्काळ म्हणजे राजकारणासाठी राजकारण असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

आधी पक्षातली कुरघोडी थांबवा,मग आम्हाला टक्कर द्या;पंकजा मुंडेचा पवारांना खोचक सल्ला

माढ्याचा तिढा …म्हणून मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे : प्रभाकर देशमुख