‘शिवसेनेचा विरोध तरी मुख्यमंत्री म्हणतात नाणार होणारचं’

cm devendra fadanvis

टीम महाराष्ट्र देशा:-नाणार प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार असेल तर या रिफायनरी प्रकल्पाचा फेरविचार करायला काहीच हरकत नाही. मी अगोदरपासूनच हा प्रकल्प व्हावा असे म्हणत होतो , असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला होता.मुख्यमंत्र्याच्या या विधानानंतर नाणार रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा भाजप- शिवसेना युतीमध्ये मोठी दरी निर्माण पडण्याची शक्यता आहे.

महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची रत्नागिरीमधील राजापूर येथे सभा झाली. त्यावेळी उपस्थितांकडून,नाणार प्रकल्प व्हावा, नाणार…नाणार… अशा घोषणा झाल्यावर त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे हे मी ओरडून सांगत होतो. हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प आहे. मात्र ज्याप्रकारे या प्रकल्पाला विरोध झाला ते पाहून मी तो निर्णय रद्द केला.

पण तुमचा उत्साह पाहिल्यावर या प्रकल्पाची पुन्हा एकदा चर्चा करावी, असे मला वाटते. या प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. आज मी या प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय जाहीर करत नाही पण लवकरच मी या संदर्भात तुम्हाला भेटेन, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान लोकसभा निवडणुकांपूर्वी युती करताना शिवसेनेनं नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्याची अट घातली आणि तसं करण्यासाठी भाजपला भाग पाडलं. मात्र विधानसभेपूर्वी शिवसेनेनं आरेवरून दबावाचं राजकारण सुरू केलं असताना, मुख्यमंत्र्यांनी नाणारसंदर्भात मोठं विधान केलं आहे.