fbpx

Breaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री

chief-minister-devendra-fadnavis-pti.jpg.image.975.568

टीम महाराष्ट्र देशा : ओबीसी, एससी, एसटी अशा कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणारच अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर श्रेयाची लढाई खेळू पाहणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली आहे तर मराठ्यांनो एक डिसेंम्बर ला जल्लोष करा असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मध्ये शेतकरी-वारकरी महासंमेलन मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी शिणीदेवाचा अभिषेक करून दर्शन घेतले. दरम्यान,मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीची वस्तूस्थिती मांडणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्याच्या मुख्य सचिवांकडे सुपूर्द करण्यात आला. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी आज दुपारी मंत्रालयात जाऊन मुख्य सचिव डी. के जैन यांची भेट घेतली. त्यांनतर आयोगाच्या सदस्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीचा अहवाल डी. के. जैन यांच्याकडे सादर केला.

मागासवर्ग आयोगाचा हा अहवाल गोपनिय असला तरी त्यात मराठा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे आयोगाला मिळालेल्या निवेदनांमध्ये राज्यातील इतर समाजांनीही मराठा समाजाच्या आरक्षणाचे समर्थन केले आहे.

मुख्य सचिव हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बुधवारीच अहवालावरील सर्व प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.