… म्हणून पोलिसांनी ठोठावला मुख्यमंत्र्यांना दंड

मुंबई – ‘मुख्यमंत्री वापरत असलेल्या वाहनांवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे ई-चलानच्या माध्यमातून एकूण १३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र, हा दंड अद्याप ‘पेंडिंग’ असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी केलेल्या दाव्यानुसार, जानेवारी ते मे २०१८ या काळात मुख्यमंत्र्यांच्या वाहन क्रमांक एमएच-०१-सीपी-००३७ आणि एमएच-०१-सीपी-००३८ या दोन्ही वाहनांवर वांद्रे-वरळी सागरी सेतूवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे ई-चलानच्या माध्यमाने दंड ठोठावण्यात आला आहे.

मात्र वेळोवेळी ठोठावण्यात आलेला हा दंड भरलाच नसल्यामुळे मुंबई पोलीस ट्रॅफिक कलमानुसार आतापर्यंत दंडाची १३ हजार रुपयांची रक्कम ‘पेंडिंग’ आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर दंडाची थकबाकी भरत नाहीत, तर सामान्य जनतेने तरी तो का भरायचा, असा सवाल उपस्थित करत थकबाकीच्या वसुलीसाठी ठोस कारवाई करण्याची मागणी अहमद यांनी केली.

 

भाजप म्हणजे ‘जेल गाडी’ आणि ‘लिंच पुजारी’- कॉंग्रेस

थापा मारून राज्य आणायचे यालाच ‘चाणक्य’नीती म्हणायचे का ?