शेतकरी प्रश्नांवर शरद पवार आज मुख्यमंत्र्यांशी बोलणार

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी, बोंड अळी, ओखी वादळाने आंबा शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान यावर मोठा गदारोळ सुरु आहे. अजित पवार यांनी तर मुख्यमंत्र्यांना खरच कर्ज माफी झाली का ? असा सवालच केला होता. या सगळ्या प्रश्नावर आता देशाचे माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार यांना डॉक्टरांनी प्रवास करायला न सांगितल्यामुळे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘हल्लाबोल’ आंदोलन केल होत. या आंदोलनाच्या समारोपाच्या भाषणात शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी सुद्धा केली होती. जोपर्यंत सरकार संपूर्ण कर्जमाफी देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी वीजबिल भरू नये अस आवाहन सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना केलं होत.

आज होणाऱ्या या अनोख्या बैठकीत केंद्रित मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित राहू शकतात अशी शक्यता आहे त्यामुळे आजच्या या बैठकीत नक्की काय चर्चा होणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.