फडणवीस-अजित पवारांचा एकत्र हवाई प्रवास

ajit-pavar devendra fadanvis

औरंगाबाद :एकमेकांचे कट्टर विरोधक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क एकाच विमानातून प्रवास केला. एका लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी दोन्ही नेते एकाच विमानातून रवाना झाले.विशेष म्हणजे विमानतळावर उतरल्यानंतर दोघंही एकाच गाडीनं लग्नसोहळ्यात पोहोचले. काल रात्री रात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईहून आपल्या खास विमानाने औरंगाबादकडे निघाले.चिकलठाणा विमानतळावर विमान लँड झालं, त्यावेळी दोन्ही नेते या विमानातून उतरले आणि पुढे एकाच गाडीनं लग्नकार्यात पोहोचले.या विमानप्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरीही दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून कार्यकर्त्यांना मात्र सुखद धक्का पोहचला.Loading…


Loading…

Loading...