लोकसभेचा निकाल लागताच मुख्यमंत्री दुष्काळ दौरा करणार

Maharashtra CM Devendra Fadnavis

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर दुष्काळ दौरा करणार असल्याची माहिती समोर आले आहे. २३ मे नंतर मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि आणि शेवटच्या टप्प्यातील आज मतदान सुरु आहे. येत्या २३ मे ला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सध्या महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निराम्न झाली आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी दुष्काळी दौरे सुरु केले आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी दौरा न करता दुष्काळी भागांची पहाणी फोनवरून घेतली आहे.

याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ मे नंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच दुष्काळ दौरा करणार आहेत. महसूल विभाग निहाय मुख्यमंत्री हा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकाही तोंडावरच येऊन ठेपल्या आहेत.