हि राजकीय कुरघोडीची वेळ नाही, सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाईल – मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, यामध्येच सांगली जिल्ह्यातील ब्राम्हणाळ गावामध्ये बोट उलटून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा दौरा करत सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

 

पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आढावा दिला आहे, यावेळी
बोलताना स्टगार्ड, नौदल एनडीआरएफच्या एकूण ६० बोटी नागरिकांचे बचावकार्य करत आहेत,
सांगलीतली परिस्थिती अतिशय भीषण जाणवली. असून जिल्ह्याला सगळीकडे पाण्याने वेढलं आहे, पुरात अडकलेल्या नागरिकांना एअरलिफ्टिंग करण्याचेही प्रयत्न सुरु असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा त्यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यामध्ये पूरस्थिती असताना सरकार योग्य उपाययोजना करत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे, यावर बोलताना हि राजकीय कुरघोडीची वेळ नसून सर्वांनी एकत्र येत काम करण्याची गरज आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक केले आहे.