मुख्यमंत्र्यांनी मानले अजित पवारांच्या कामाचे आभार

पुणे: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना फडणवीस यांनी प्रशासनाला ‘उदघाटन फलकाच्या बाजूला भूमिपूजन फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ज्यांनी भूमिपूजन केलं त्यांचंही योगदान असल्याने त्यांचे मनापासून आभार मानतो, असे ते म्हणाले आहेत

दरम्यान या नवीन इमारतीच बांधकाम हे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आले होते. यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांनी जुण्या इमारतीच्या नूतनीकरनासाठी पाठपुरावा केला होता. तसेच त्याच भूमिपूजनही अजित पवार यांच्या हस्तेच करण्यात आल होत.