म्हणून कबीर कला मंचवर पोलिसांच्या धाडी : देवेंद्र फडणवीस

मुंबई: कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरशी संबंधित मुंबई, पुणे, नागपूर आणि गडचिरोलीत अनेक ठिकाणी पोलिसांकडून छापे टाकण्यात आले आहेत. सर्वप्रथम हे छापे एल्गार परिषदेशी संबंधित असल्याच बोलल जात होत, मात्र नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या संशयावरून देशपातळीवर केंद्रीय पथकांकडून हे छापे घालण्यात आल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे.

आज सकाळपासून कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या पुणे, मुंबई तसेच नागपूर कार्यालय आणि घरांवर पोलिसांनी धाडी टाकल्या. यामध्ये कबीर कला मंचचे रमेश गायचोर यांच्या येरवडा येथील तर सागर गोरखे यांच्या वाकड येथील घरावर पुणे पोलसांनी धाड टाकली. तर मुंबईत सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार यांच्या घरी देखील चौकशी केली करण्यात आली.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, आज पोलीसांकडून करण्यात आलेली कारवाई हि एल्गार परिषदेशी संबंधित नसून नक्षली चळवळींशी संबंधित असलेल्या शहरी भागातील लोकांविरूद्ध करण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणांकडून महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीमध्ये देखील अशाप्रकारे छापे टाकण्यात आले आहेत.

You might also like
Comments
Loading...