मुख्यमंत्र्यांकडून जनतेच्या पैश्यांची उधळन सुरूच; जाहिरातीवर साडेचार कोटींचा खर्च

टीम महाराष्ट्र देशा: एका बाजूला निधी अभावी राज्यातील अनेक योजनांना कात्री लावण्याची वेळ आली आहे. तर निधी वाचावा यासाठी शेतकरी कर्जमाफी सारख्या योजनांना वेगवेगळे निकष लावले जातात. मात्र याच सरकारकडून जाहिरात बाजीवर तब्बल ४ कोटी ४५ लाख रुपये मुक्त हस्ताने उधळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जनतेशी संवाद साधण्यासाठी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ दिलखुलास आणि जय महाराष्ट्र हे कार्यक्रम सरकारकडून घेतले जात आहेत. या कार्यक्रमांसाठी तब्बल 4 कोटी 45 लाख रुपये खर्च केला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे याला अर्थ विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे.

 

एका बाजूला राज्याच्या तिजोरीत असणारा खडखडाट तर दुसरीकडे जनतेशी संवाद साधण्यासाठी केला जाणारा वारेमाप खर्च हा पटणारा नाही. त्यामुळे सरकारने जाहिरात बाजी करण्याऐवजी लोकांमध्ये जाऊन काम करण्याची गजर आहे.

You might also like
Comments
Loading...