औरंगाबाद कचरा आंदोलन पोलीस आयुक्तांना भोवणार?; मुख्यमंत्र्यांनी दिले सक्तीच्या रजेचे आदेश

औरंगाबाद शहरात निर्माण झालेली कचरा कोंडी सुटताना दिसत नाही, तर दुसरीकडे कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांवर करण्यात आलेला लाठीचार्ज पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना भोवणार असल्याच दिसत आहे. कारण यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात येणार असल्याच माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.

शहरात निर्माण झालेल्या कचरा कोंडीला महापालिका व पोलीस आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे पोलीस आयुक्तांचे निलंबित झाल्या शिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचा पवित्रा विरोधकांनी घेतला होता. अखेर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

You might also like
Comments
Loading...