मतांसाठी पाकिस्तानच्या फायद्याच बोलू नका, मुख्यमंत्र्याचा पवारांना सल्ला

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानबद्दल वक्तव्य केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या याच विधानाचा समाचार घेतला आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्या वक्तव्याचा फायदा पाकिस्तानला होतो कि भारताला हे त्यांनी पहायला पाहिजे, केवळ मतांसाठी अशाप्रकारे वक्तव्ये करणं योग्य नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

अल्पसंख्याक मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भारत – पाकिस्तानमध्ये फुट पडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण देशात बनवलं जात आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये फुट पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे पाहता पाकिस्तानमध्ये एवढी वाईट परिस्थिती नाही. काही लोक स्वतःचा फायद्यासाठी वातावरण दूषित करत आहेत, असं पवार यांनी म्हंटले होते.

दरम्यान, भारतातील मुस्लिमांमध्ये देशाविषयी आदर आहे. त्यांच्यासमोर पाकिस्तानची स्तुती करून मिळतील, हा विचार करणे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे, यामधून राष्ट्रवादीची मानसिकता दिसत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.