नाणार प्रकल्प: निर्णय तर मीच घेणार; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला पुन्हा दणका

मुंबई: नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना – भाजपमध्ये सुरु असणारा कलगीतुरा आणखीन वाढणार असल्याच दिसतय, शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून नाणारची अधिसूचना रद्द करण्याचे पत्र दिले आहे, मात्र या संदर्भात महाराष्ट्र आणि कोकणाचे हित तपासून मीच निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

कोकणात नव्याने येवू घातलेल्या नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांकडून जोरदार विरोध केला जात आहे. शिवसेनेकडून स्थानिकांच्या सुरात-सूर मिसळत विरोध केला जात आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये सभा घेत कोणत्याही परीस्थितमध्ये नाणार प्रकल्प कोकणात येवू देणार नसल्याचे सांगितले होते, दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आधी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपण नाणारची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली.

देसाई यांनी अधिसूचना रद्दची घोषणा केल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाचा असल्याचे सांगितले, त्यामुळे देसाई यांची घोषणा म्हणजे केवळ पोकळ गप्पाच असल्याचे उघड झाले. यानंतर आता शिवसेना नेते आक्रमक झाले असुन मंत्रिमंडळ बैठकीत देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

You might also like
Comments
Loading...