हल्लाबोल करणाऱ्यांच्या ‘डल्लामार यात्रेचे’ पुरावे सभागृहात येतील – मुख्यमंत्री

नागपूर: राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हल्लाबोल आंदोलन केले जात आहे. त्यातच आता हिवाळी अधिवेशन सुरु झाल्याने सभागृहातही सरकारला धारेवर धरले जाणार हे निश्चित आहे. मात्र सध्या हल्लाबोल करणाऱ्यांच्या ‘डल्लामार यात्रेचे’ पुरावे सभागृहात येतील म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातल्या लढाईस आपणही तयार असल्याच दाखवल आहे.

काळ नागपूरमध्ये चहापानाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच विरोधका आणखीनही सैराटवरच अडकले असून,त्यानंतर अनेक चित्रपट आले आहेत त्यामुळे त्यांनी बाहेर पडण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.

You might also like
Comments
Loading...