शरद पवारांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही – फडणवीस

मुंबई : काल रविवारी राष्ट्रवादीचा १९ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पुण्यामध्ये पार पडला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम सोहळ्यात बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधांना जीवे मारण्याची आलेली धमकी म्हणजे लोकांची सहानभूती मिळवण्यासाठी पेरलेल्या बातम्या असल्याचा संशय व्यक्त केला होता.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे श्री शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी! पंतप्रधान हे पक्षाचे नाही,तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे,द्वेषाचे नाही! असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिले आहे. दरम्यान पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत,सत्य काय ते बाहेर येईलच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.Loading…
Loading...