आता बोलायचीच सोय राहिली नाही; मुख्यमंत्री

cm devendra fadanvis

औरंगाबाद: पूर्वी नेते परखड मत मांडायचे, पण आता अस परखड बोलल्यावर त्याचा नंतर काय अर्थ निघेल सांगता येत नाही. त्यामुळे भाषण करताना सांभाळून बोलाव लागत, त्यामुळे आता बोलायचीच सोय राहिली नसल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

जेष्ठ नेते बाळासाहेब पवार यांच्यावर आधारित नितीधुरंधर पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. आजकाल भाषणामध्ये विनोदसुद्धा करता येत नाहीत. पुढे विनोदाचा भाग काढून कोण काय आणि किती दिवस चालवून ठोकून काढेल हे सांगताच येत नसल्याचही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, विरोधीपक्ष नेते विखे-पाटील यांनीही सोशल मीडियामुळे राजकारण्यांवर अनेक बंधने आल्याच सांगितले. तसेच आता आम्ही काय आणि कोणत्या ताटात खातो, काय बोलाव काय बोली नये यांच्या चर्चा सोशल मिडीयावर रंगत असल्याची मिश्कील टिप्पणी केली.