fbpx

ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्यावर राहुल गांधी गप्प का ?

मुंबई : बोफोर्स असो, पाणबुडी असो की आताचा ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळा असो, प्रत्येक घोटाळ्यात एकाच कुटुंबाचे नाव येते कसे याचे उत्तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आता द्यावे लागेल असा सवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीत मोठा घोटाळा बाहेर आला आहे. याबाबत इटलीच्या न्यायालयाने दिलेल्या निकालात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव चारवेळा आल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

या घोटाळयातील दलाल मिशेल याला भारतात आणण्यात आले आहे. ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. सोनिया गांधी यांच्याबाबत मला ईडीने प्रश्न विचारले तर मी काय उत्तर देऊ, अशा प्रश्नाचा कागद मिशेल याने त्याच्या वकीलांना दिला. मिशेलला काँग्रेसने त्यांचा नेता वकील दिला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी हे या घोटाळ्यात गुंतले नसतील तर वकिलांना मिशेलने पत्र देण्याचे काय कारण आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.