मराठा आरक्षण : वारकऱ्यांना वेठीस धरणारे छत्रपतींचे मावळे असूच शकत नाहीत – मुख्यमंत्री

सोलापूर : पंढरीच्या वारीत हिंसा घडविण्याचा कट होता. लाखो वारकऱ्यांच्या हितासाठी आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे तसेच वारकऱ्यांना वेठीस धरणारे छत्रपतींचे मावळे असूच शकत नाहीत असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

पंढरपुरात दरवर्षी आषाढीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होते. मात्र यासाठी मराठा समाजाचा विरोध होता. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत 72 हजारांची भरती रद्द करावी अशी काही संघटनांची भूमिका आहे. त्यामुळे मला विठ्ठलाची पूजा करण्यापासून रोखण्यात येत आहे. तसेच पंढरपुरात अनुचित प्रकार घडविण्याचाही या संघटनांचा डाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारकऱ्यांमध्ये साप सोडू देऊ, चेंगराचेंगरी घडवू असे प्रकार घडविण्याचा हेतू बाळगल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पंढरपुरातील 10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचे हित लक्षात घेऊन मी महापूजेला जाणार नाही. विठ्ठलाचा सेवक म्हणून मी माझ्या घरी विठ्ठलाची पूजा करेल, असेही फडणवीस यांनी म्हटले.

Loading...

वारकऱ्यांना भक्तीभावाने विठ्ठलाचे दर्शन घेता यावे, हीच महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा आणि विठ्ठलाचा सेवक म्हणून माझी इच्छा आहे. मराठा समाजाचा आरक्षणसंदर्भात माझी भूमिका आंदोलकांच्या हिताचीच आहे. मराठा आरक्षणाचा मुद्द्दा आता सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहे. सरकार त्यासाठी सर्वोतोपरी करत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ