fbpx

लिंगायत समाजातल्या उपजातींचा इतर मागासवर्गात समावेश करण्यासाठी हालचाली सुरु

मुंबई : लिंगायत समाजातल्या हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत आणि रेड्डी या उपजातींचा, इतर मागासवर्गात समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

लिंगायत रेड्डी, हिंदू लिंगायत आणि हिंदू वीरशैव ह्या लिंगायत समाजातल्याच उपजाती आहेत, याबाबत तातडीनं निर्णय घेण्यासंदर्भात मागासवर्ग आयोगाला विनंती केली जाईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मंगळवेढा इथल्या नियोजित जगद्‌ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचा आराखडा लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.