…म्हणून युती गरजेची, मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत

राज्यात भाजपची ताकद वाढली असली तरी युतीमध्ये फूट पडून त्याचा फायदा काँग्रेसला होऊ नये, म्हणून युती गरजेची असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल राज्यभरातले पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्र्यांची बैठक झाली.

मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या. आणि युती महायुतीची बाबात चर्चा जोरदार होऊ लागल्या. मिनि विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या  निवडणूकीकडे साऱ्यांचच लक्ष लागून राहिलं आहे. या निवडणूकीत मित्रपक्ष भाजप – शिवसेना युती कायम ठेवणार का? की इतर राज्यांच्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणूकींच्या निकालाप्रमाणे भाजप सरस ठरेल. याबाबत अनेक चर्चा रंगल्या असताना मुख्यमंत्र्यांनी युती संदर्भात वक्तव्य केलं आहे. राज्यात भाजपची ताकद वाढली असली तरी युतीमध्ये फूट पडून त्याचा फायदा काँग्रेसला होऊ नये, म्हणून युती गरजेची असल्याचं मत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल राज्यभरातले पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मत मांडलं. नगरपालिका निवडणुकीत भाजप हा एक क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पण या निवडणुकीत काँग्रेसही दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला फारसा फटका बसलेला नाही. त्यामुळे राज्यातला काँग्रेस पक्ष कमकुवत करायचा असेल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती आवश्यक असल्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी मांडल्याचं कळतं.