आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

टीम महाराष्ट्र देशा- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचत आहेत. मात्र ही यात्रा सुरु झाल्याप्पासून आदित्य ठाकरे हेच शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील अशी चर्चा आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलेले पहायला मिळत आहे.

युती बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना आपण आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. तसेच त्यांना सरकारचा भाग म्हणून पहायला आवडेल, असेही ते म्हणाले.

Loading...

आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास कोणतीही अडचण नाही. आम्ही आताही त्यांना हे पद देऊ शकतो. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे ठाकरे परिवारातील पहिले सदस्य ठरतील. तसेच त्यांना सरकारमध्ये पहायलाही आवडेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री हा दावा करीत असले तरीही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मात्र काहीसं वेगळे मत व्यक्त केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे जी, ‘माझे वैयक्तिक मत आणि सल्ला असा आहे की, आदित्य यांना मुख्यमंत्री म्हणून समोर करून शिवसेनेतच त्यांना दुष्मन तयार केले जात आहेत. पक्षांतर्गत राजीनाराजी त्यावरून होऊ शकते. आम्ही इतकी वर्षे काम करतो, मग आमचे काय असा प्रश्न काही जणांकडून पक्षातूनच केला जाऊ शकतो. शेवटी मुख्यमंत्री कोणाचा याचा निर्णय भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील अस मत व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाड्यातून होणार आणखीन एका ठाकरेंची एन्ट्री

आदित्य ठाकरेंनी उडवली बाळासाहेब थोरातांची खिल्ली

#पक्षांतर : भाकरी करपण्यासाठी स्वतः शरद पवारच जबाबदार : विनायक मेटे

शिवसेनेची ‘नवी दिशा, नवी वाट’ सुरू झालीये – संजय राऊत

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'