शिवसेनेचे बंड शमवण्यासाठी भाजपची खेळी: उपमुख्यमंत्री पदाची ऑफर?

एकनाथ शिंदे यांच्या नावाला मुख्यमंत्री अनुकूल असल्याची माहिती

मुंबई: विधानसभेला अवघे दोन वर्ष शिल्लक राहिले असतानाच आता भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेच्या इतर मंत्र्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जास्ती पसंती असल्याच देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाच लक्ष लागल आहे.

नारायण राणे यांच्या मंत्री पदाच्या स्वप्नाला शिवसेनेने कात्री लावली आहे, आणि तेव्हापासूनच उद्धव ठाकरे कायमच भाजप विरुद्ध आक्रमक राहिले आहेत. मात्र पुढेही असच कायम राहील तर येणाऱ्या विधासभा निवडणुकीत याचा फटका भाजपसह शिवसेनेला देखील होईल, याचा अंदाज मुख्यमंत्र्यांना आला असेल त्यावरूनच उपमुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्यात मुख्यमंत्री अनुकूल असल्याच कळतंय. एमआयडीसी जमीन घोटाळ्यात आरोप असलेले सुभाष देसाई यांच्या नावाला देवेंद्र फडणवीस अनुकूल नसल्याच समजतंय, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे याच नाव आता समोर येत आहे. त्यामुळे या सर्व विषयांवर स्वतःह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.