मागच्यावेळेस महापुजेपासून रोखणाऱ्या मराठा समाजाने यंदा केला पंढरपुरात मुख्यामंत्र्यांचा जंगी सत्कार

टीम महाराष्ट्र देशा :  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला, न्यायालयाच्या या निर्णयानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूरात जाहीर सत्कार करण्यात आला.

Loading...

मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण वैध असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. परंतु १२ ते १३ टक्के आरक्षण देता येईल असेही न्यायालयाने म्हंटले.

न्यायालयाच्या या निकालानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूरात जाहीर सत्कार केला. उद्या ( १२ जुलै ) आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री फडणवीस पंढरपुरात गेले आहेत. दरम्यान मराठा समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे, मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने अनेक आंदोलने केली. इतकेच नव्हे तर २०१८ च्या आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापूजेसाठी गेले असता मराठा समाजातर्फे त्यांना अडवण्यात आले होते. परंतु यंदाच्या वर्षी त्याच मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांचा पंढरपुरात जंगी सत्कार केला.Loading…


Loading…

Loading...