क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

नाशिक : मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंग कराव लागल आहे. फडणवीस हे आज नाशिकवरून औरंगाबादला जात असताना हि घटना घडली. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि काही सचिवही होते.

नाशिकमध्ये हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. त्यानंतर वजन कमी करण्यासाठी एका सचिवाला खाली उतरवण्यात आलं आणि विमानाने उड्डाण केले. दरम्यान आधी लातूर नंतर रायगड आणी आता नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरसोबत घडलेल्या घटनांनमुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे

You might also like
Comments
Loading...