fbpx

फेसबुकवर लाईव्ह पत्रकार परिषद घेणाऱ्या मुख्यमंत्र्याना नागरिकांचा रोखठोक सवाल

टीम महाराष्ट्र देशा – सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करत भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आले. सत्तेत आल्यानंतर देखील भाजप आपल्या कामाला सोशल माध्यमावर भरभरून प्रसिद्धी देत आहे. जाहिरातींवर भरमसाठ पैसा खर्च केला जात आहे. मात्र या जाहिरातबाजीवरूनच भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात येत आहे. आज अशाच टीकेचा सामना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील करावा लागला आहे.

आज नोटाबंदीच्या वर्षपूर्ती निमित्त नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेचे त्यांच्या अधिकुत फेसबुक पेजवर लाइव्ह केले. लाइव्ह केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री दिसू लागले. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नोटाबंदीचे फायदे पत्रकारांना सांगत होते. यावेळी फेसबुक लाइव्हला अनेक लोक मुख्यमंत्र्यांना थेट सवाल विचारत होते. अनेकांनी तर नोटाबंदीचा तीव्र शब्दात निषेध देखील केला. या बरोबरच अनेकांनी अभिनंदन देखील केले. या तर अनेक नागरिकांनी प्रलंबित प्रश्नांची आठवण फडणवीस यांना करून दिली.

 

cm
file photo

 

 

cm
file photo