नाभिक समाजाबद्दल मला प्रचंड आदर; पुन्हा एकदा माफी मागतो – मुख्यमंत्री

कोल्हापूर: नाभिक समाजाबद्दल मला प्रचंड आदर आहे . मात्र समजाबद्दल मी केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरु आहे. चूक लक्षात येताच तात्काळ पत्रक काढून मी माफी मागितली होती. मात्र तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाभिक समाजाची माफी मागितली आहे. कोल्हापूरमधील वारणानगर येथे आयोजित मुख्यमंत्री दिलखुलास या कार्यक्रमात ते बोलत होते.

काय आहे वाद
ज्या प्रकारे एक न्हावी तीन- चार ग्राहक असतील तर प्रत्येकाची अर्धी-अर्धी हजामत करतात तशाप्रकारे काँग्रेसने प्रत्येक ठेकेदाराला मलाई देऊन कामं अर्धवट ठेवली होती, अशा प्रकारचं वादग्रस्त विधान काही दिवसांपूर्वी दौंडमधील पाटस येथे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर नाभिक समाजाने तीव्र आक्षेप नोंदवत ठिकठिकाणी मोर्चे देखील काढले होते .