कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या काळात त्यांचे नेतेच सरकारी योजनांचे लाभार्थी – मुख्यमंत्री

पुणे: कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या काळात त्यांचे नेतेच सरकारी योजनांचे लाभार्थी होते. त्यामुळे लाभार्थ्यांचे फोटो देऊन जाहीरात छापण्याची त्यांची हिंमत झाली नाही. आम्ही लाभ जनतेपर्यंत पोहचवले म्हणून जाहीरात छापल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीवरून होत असलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. दौंडमधील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभावेळी ते बोलत होते.

विरोधकांनी सरकारच्या जाहिरातीमधल्या लाभार्थी शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे.

 

You might also like
Comments
Loading...