fbpx

‘मान न मान मैं तेरा मेहमान’; मुख्यमंत्र्यांनी केले राज ठाकरेंवर शरसंधान

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ‘मान न मान मैं तेरा मेहमान’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर शरसंधान केले आहे.

‘न्यूज18 लोकमत’च्या न्यूज रूम चर्चेत बोलत असताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टिका केली. राज आमचे जुने मित्र असल्याचं सांगत भाजपविरोधात राज ठाकरेंनी सभा घेतल्या तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही हे स्पष्ट केलं. उलट राज ठाकरेंच्या सभांचा फायदा मोदींना होईल. तसेच राज ठाकरेंच्या या निर्णयामुळे त्यांचा मतदार दूर जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात साधारण सहा ते नऊ जागांवर राज यांच्या सभा होतील अशी माहिती समोर येत आहे. यात बारामती, मावळ, नाशिक, नांदेड, सातारा, सोलापूर, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य मुंबई आदी लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे.अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, चर्चेतील सर्व मतदारसंघ हे आघाडीच्या दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आहेत. त्यामुळे आघाडीतील दिग्गजांसाठी मनसेची तोफ धडाडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे