fbpx

रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खुळं, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

नांदेड: मनसे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती, नंतर महाराष्ट्रात मतदार नसलेली सेना झाली. आता तर उमेदवारचं नसलेली सेना बनली आहे, राज ठठाकरेंच काम म्हणजे रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खूळ, अशी झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नांदेडमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

महाराष्ट्र गोदावरीच्या पाण्यासाठी भांडत असताना ते गुजरातला वळवले जात आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसवलेले मुख्यमंत्री असल्याने ते यावर काहीच बोलत नाहीत. असा घणाघात शुक्रवारी राज ठाकरे यांनी केला होता. तसेच महाराष्ट्रात २४ हजार गावं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत, मग तुम्ही पाण्यावर काय काम केलं? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज ठाकरे गोदावरीच्या पाण्याबद्दल विचारात, मात्र हा करार आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाणांनी केला होता, मी मुख्यमंत्री झाल्यावर तो रद्द केला असे सांगितले. असा आरोप फडणवीस यांनी केला.

दरम्यान, राज ठाकरे यांचे सध्या राज्यभरात स्टॅंड अप कॉमेडीचे शो सुरु आहेत, मुंबईनंतर काल नांदेडमध्ये शो झाला. अशी टीका विनोद तावडे यांनी केली आहे. ज्यांच्या पक्षाचा एक खासदार – आमदार नाही, उरले सुरलेले नगरेसवक देखील पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे ते दुस-याला संपविण्याची भाषा कशी काय करतात, असा टोलाही त्यांनी लगावला.