मी राज्यात सुप्रिया सुळेंच्या नव्हे तर जनतेच्या भरवशावर फिरतो:मुख्यमंत्री

chief-minister-of-maharashtra-devendra-fadnavis

मुंबई:कोपर्डी बलात्कार खटल्याचा निकाल 1 जानेवारीपर्यंत लावा अन्यथा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याला मुख्यमंत्र्यांनी मुंबईत प्रत्युत्तर दिलं आहे मी राज्यात त्यांच्या ( सुप्रिया सुळे) भरवशावर फिरत नाही, तर जनतेच्या भरवशावर फिरतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षात कोपर्डीतील अत्याचाराचा निकाल लावला जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र दीड वर्षे झालीतरी निकाल लागलेला नाही. त्यामुळे आगामी काळात निकाल लावला गेला नाही तर 1 जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरून देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला होता यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला आहे. मी राज्यात त्यांच्या ( सुप्रिया सुळे) भरवशावर फिरत नाही, तर जनतेच्या भरवशावर फिरतो अशी वक्तव्य केल्यामुळे आरोपीला फायदा होतो. खटल्याचा निर्णय लावणं आमच्या हातात नाही, न्यायालयाच्या आहेत. खोट्या राजकीय फायद्यासाठी असं वक्तव्य करणं योग्य नाही अशी देखील टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे