fbpx

अजित दादांच्या विखेंबाबतच्या त्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

टीम महाराष्ट्र देशा : कोणत्याही सभागृहाचे सभासद नसताना नेते मंत्रिपदाची शपथ कशी घेतात? अजित पवार यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. पात्र असलेल्या कुठल्याही व्यक्तीला मंत्रिपद देता येऊ शकते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटले.

पावसाळी अधिवेशनाला आज सुरवात झाली आहे. हे अधिवेशन राज्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अधिवेशनावेळी चांगलीच खडा जंगी होणार असल्याचे दिसत आहे. मात्र आज अधिवेशनाच्या सुरवातीलाच विरोधकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कोणत्याही सभागृहाचे सभासद नसताना नेते मंत्रिपदाची शपथ कशी घेतात? असा सवाल केला. अजित पवारांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

असा कुठलाही कायदा नाही, भारतीय संविधानानुसार मंत्रिपदाच्या पात्र असलेल्या कुठल्याही व्यक्तीला ६ महिन्यांकरिता मंत्रीपद देता येऊ शकते. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपद देता येत नाही. परंतु त्यांनी जर राजीनामा दिला असेल तर त्यांना मंत्रिपद देता येऊ शकते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.