मुख्यमंत्र्यांचा क्लीन चिट देण्याचा सपाटा; मग दोषी कोण आणि घोटाळे कोणी केले?

मुंबई: आपण टीव्हीवर एखाद्या डीटरजंट पावडरची जाहिरात बघतो ज्यामध्ये मळकटलेले कपडे देखील स्वच्छ धुतले जाण्याचा दावा केला जातो. आपल्याला माहित असत कि कपड्यावरील एखादा डाग काही केल्या निघणार नाही, डीटरजंट कंपनी मात्र छाती ठोकपणे ‘क्लिंनींग’ करण्याचा दावा करत असते. असच काहीस चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये पहायला मिळत आहे. कारण घोटाळ्याचे आरोप झालेल्या प्रत्येक मंत्री आणि व्यक्तीला क्लीनचीट देत त्यांचे डाग धुवून काढण्याचा सपाटाच मुख्यमंत्र्यांनी लावला आहे.

भीमा कोरगाव हिंसाचारात संभाजी भिडेंना क्लीन चीट दिल्यानंतर आता करोडो रुपयांची ‘वन टाईम सेटलमेंट’करून कर्जमाफी मिळवलेले संभाजी पाटील निलंगेकर आणि तोरणमाल रिसॉर्ट प्रकरणी पर्यटन मंत्री जयकुमार रावल या दोघांनाही क्लीन चिट दिली आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे यांच्या विरोधात एकही पुरावा मिळाला नसल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सांगितले होते, त्यानंतर आता आरबीआयच्या नियमानुसार वन टाईम सेटलमेंट पद्धतीने सेटलमेंट करण्यात आली असून युवा मंत्र्याला बदनाम करू नये असे आवाहनच फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे तोरणमाल कंपनीचे संचालक नसून त्यांचा कंपनीशी काहीही संबंध नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

You might also like
Comments
Loading...