मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाची फसवणूक; सोलापूर विद्यापीठ नामांतराची घोषणा फसवी: मनोहर धोंडे

manohar dhonde shiva sanghtna

औरंगाबाद: रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची मागणी मान्य करत सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर याचं नाव देण्याची घोषणा केली आहे. मात्र यानंतर आता लिंगायत समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत. कोणत्याही विद्यापीठाच नामांतरण करायचं असल्यास आधी विद्यापीठ सिनेटने प्रास्तव मंजूर करावा लागतो. त्यानंतरच नामांतरण होवू शकते म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी केला आहे.

सोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेपासून लिंगायत समाजाकडून महात्मा बसवेश्वर अथवा सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर याचं नाव देण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे धनगर समाजाकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र काल अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर याचं नाव देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर लिंगायत समाजाची मुख्य संघटना असलेल्या शिवा संघटनेकडून फडणवीस यांचे राज्यभर पुतळे जाळण्यात आले आहेत. दरम्यान आज ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

प्रा. मनोहर धोंडे यांची संपूर्ण मुलाखत