‘कोणी त्यांची जात काढली तर कोणी त्यांच्या बायकोला लक्ष्य केले… पण तरी हा माणूस डगमगला नाही’

 वाढदिवसाच्या शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब !

सध्या महाराष्ट्राचे राजकारण या एका व्यक्ती भोवती फिरतंय…महाराष्ट्रात सत्ता आल्यावर ‘चांगली इमेज’ या एकाच मुद्दयावर मोदींनी फडणवीसांना मुख्यमंत्री केलं हा बहुदा सर्वांचा समज होता…माझाही होता.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा काटेरी मुकूट डोक्यावर ठेवणं अतिशय कठिण असल्याने फडणवीस पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणे अवघड आहे असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता.पण सगळे अंदाज खोटे ठरवत या माणसाने स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले. यांच्याच काळात सर्वात जास्ती मोर्चे झाले, अनेक संकटं आली. कोणी फडणवीसांची जात काढली तर कोणी अगदी त्यांच्या बायकोलाही लक्ष्य केले… पण तरी हा माणूस डगमगला नाही.या माणसाचा खरच हेवा वाटतो.

Loading...

काही महिन्यातच ते त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करतील.. साडेचार वर्षात त्यांच्यावर एकही आरोप नाही, कुठलाही डाग नाही. उथळ पणे केलेलं वक्तव्य नाही की रागाच्या भरात कधी कोणाशी बोलले नाहीत… जे काही केलं ते शांतपणे, संयम ठेवून…महाराष्ट्रातील बाहुबली घराण्यातील युवा नेत्यांना स्वत:सोबत घेणे असो की जादूची काडी फिरवल्या प्रमाणे बंडाच्या तयारीत असणाऱ्या मित्रपक्षांना अचानक शांत करणं असो… अण्णा हजारेंचे आंदोलन असो की पक्षांतर्गत विरोधक असोत..प्रत्येक ठिकाणी फडणवीसांनी स्वत:ला सिद्ध केले. विरोधी पक्षाने देखील त्यांच्यावर कधी वय्यक्तिक आरोप किंवा जहरी टीका करणे टाळले यातूनच या माणसाची ताकद दिसते..

ज्येष्ठ नेते श्री.शरद पवार यांच्या भोवतीच फिरणारे महाराष्ट्राचे राजकारण आता बऱ्यापैकी फडणवीसांभोवती फिरू लागले आहे.फडणवीसांचे सगळे निर्णय योग्यच आहेत किंवा सगळेच प्रश्न सुटले अाहेत असं माझं अजीबात मत नाही, धनगर आरक्षणाचा तीढा अजून सुटलेला नाही. ब्राह्मण समाजाचे प्रश्न देखील प्रलंबित आहेत. दिलेल्या सर्वच आश्वासनांची पूर्तता नक्कीच झालेली नाही. पण फडणवीसांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी मनापासून प्रयत्न केले हे ही तितकंच खरं…केवळ 4-5 तासाची विश्रांती आणि दिवसभर काम… चेहऱ्यावर सकाळी दिसणारे हास्य आणि उत्साह संध्याकाळी देखील टिकून असतो यावरूनच त्यांचे कामाप्रती असणारे प्रेम दिसून येते.

फडणवींसांची आपण स्तुती करू शकतो तशी टीका देखील करू शकतो. ती केली तरी त्यांच्याकडून टीकेचे स्वागतच असते, टीका करणाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा राग त्यांनी कधी व्यक्त केला नाही. त्यांच्या प्रत्येक मुलाखतीतून आणि भाषणातून त्यांची प्रगल्भता आणि आत्मविश्वास दिसून येतो…फडणवीसांची ही यशस्वी वाटचाल त्यांच्या भावी आयुष्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. भविष्यात देशाचे नेतृत्व करण्याची ताकद या माणसात आहे हे नक्की… पुढे काय घडेल हे फक्त काळच सांगू शकतो… एक मात्र नक्की, महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण हे देवेंद्र फडणवीस या माणसाभोवती फिरत आहे हे नक्की !!
– अंकित काणे (अध्यक्ष – ब्राह्मण जागृती सेवा संघ,संचालक- श्रीरामा पतसंस्था )

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू