fbpx

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देणार – मुख्यमंत्री

cm devendra fadanvis

पुणे: सोलापूर विद्यापिठ्याच्या नामांतराच्या विषयावरून सुरु असलेला वाद आणखीन चिघळणार असल्याच दिसून येत आहे. कारण विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात फडणवीस यांनी हि घोषणा केली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर ग्रामदैवत सिद्धेश्वराचे नाव देण्याची मागणी करणाऱ्या लिंगायत समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत.

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराच्या विषयावरून माघील काही काळापासून धनगर समाजाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची मागणी लावून धरण्यात आली होती. तसेच दुसरीकडे विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वराचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाकडून करण्यात येत होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आज अहिल्याबाई होळकर यांच नाव घोषित केल्याने लिंगायत समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये त्यांचे पुतळे जाळण्याचा इशारा शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे सर यांनी दिला आहे. तसेच सोलापूरमध्ये निघालेल्या मोर्चातील दोन लाख लोकांचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केला असून येणाऱ्या काळात याचे परिमाण भोगावे लागतील अशी टीकाही त्यांनी केली आहे.