वाघ-सिंहाची जोडी एकत्र येते, तेव्हा जंगलात राज्य कोणाचं हे सांगावं लागत नाही ; मुख्यमंत्र्यांची गुगली

टीम महाराष्ट्र देशा : भाजपा-शिवसेना एकत्र आहेत आणि राहतील. वाघ-सिंहाची जोडी एकत्र येते, तेव्हा जंगलात राज्य कोणाचं हे सांगावं लागत नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

काल १९ जून शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन, वर्धापन दिनानिमित माटुंगा येथील षण्मुखांनाद सभागृहात सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधले.

त्यावेळी आम्ही युती केली तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून केली होती. आमचं ठरलंय, तुम्ही चिंता करू नका,असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर, भाजपा-शिवसेना एकत्र आहेत आणि राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले. इतकच नव्हे तर वाघ-सिंहाची जोडी एकत्र येते, तेव्हा जंगलात राज्य कोणाचं हे सांगावं लागत नाही’, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याचा अर्थ जंगलात वाघ आणि सिंह सोबत असतात परंतु जंगलावर राज्य सिंहाचं असत असा निघतो. म्हणजे शिवसेना वाघ आणि भाजप सिंह आहे. शिवसेना आणि भाजप सोबत असला तरी राज्य भाजपचं आहे, असाही अर्थ मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा काढता येतो.

 

 

IMP