दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलं राणेंना एनडीएत येण्याबाबत आमंत्रण

fadnavis-rane

वेब टीम :महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करून नव्या राजकीय इनिंग ला सुरुवात करणारे नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन काल भेट घेतली.दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याबाबत आमंत्रण दिलं आहे, अशी माहिती राणेंनी बैठकीनंतर दिली.

नारायण राणे हे एनडीएमध्ये सहभागी होणार का, याबाबत राणेंच्या पक्षस्थापनेपासून जोरदार चर्चा सुरु आहे या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली.सुमारे अर्धा तास दोघांमध्ये आगामी वाटचालीविषयी चर्चा झाली .

या भेटीनंतर नारायण राणे काय म्हणाले ?

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीएत येण्याबाबत अधिकृत आमंत्रण दिलं आहे. माझा निर्णय दोन दिवसात त्यांना कळवणार आहे”, असे नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितले.मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले.