आम्ही ठरवलं तर २४ तासात मुंबईत भाजपचा महापौर बनवू शकतो-फडणवीस

बहुमत असूनही महापौर बसवला नाही :मुख्यमंत्री

मुंबई :मुंबई महापौर निवडीच्या दिवशी भाजपकडं बहुमत असूनही आम्ही आमचा महापौर बसवला नाही… आजही आम्ही ठरवलं तर २४ तासात मुंबईत भाजपचा महापौर बनवू शकतो, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यामुळे मुंबईत शिवसेना भाजप संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

३१ ऑक्टोबर रोजी भाजप सरकारला सत्तेत येवून ३ वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्ताने ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे.आगामी दोन वर्षात निवडणुकाच नाहीत त्यामुळे मनसेचे ते सहा नगरसेवक फोडून पक्ष फोडण्याचा शिक्का आम्हाला आमच्यावर मारून घ्यायचा नव्हता म्हणून आम्ही शांत राहिलो तसेच आम्ही महानगर पालिकेत पहारेकरी म्हणून सक्षमपणे काम करत आहोत. जर महापौरच बनवायचा असता तर फक्त चोवीस तासात आम्ही महापौर बनवला असता असं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाला डिवचले .