मुख्यमंत्र्यांचा मंगळवेढा दौरा : खबरदारी म्हणून माजी सैनिकांना घेतले ताब्यात

devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून, सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस हे सगळ्यात पुढे आहेत. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या प्रचार दौऱ्याचा पार्श्वभूमीवर शेतकरी नेते आणि माजी सैनिकांना ताब्यात घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.

भारतीय जनता पार्टी स्वाभिमानी रयत क्रांती शिवसेना रिपाई मित्र पक्षाचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मतदारसंघ अध्यक्ष व काही माजी सैनिकांना ताब्यात घेतले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना मतदारसंघ अध्यक्ष राहुल घुले यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यासमवेत शहरातील काही प्रमुख माजी सैनिकांना देखील ताब्यात घेतले आहे.

ग्रामीण भागातील काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेली असल्याचे समजते दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा आंदोलन करण्याचा किंवा कृतीचा इशारा दिला नसताना ही कारवाई केल्यामुळे त्यांच्यातून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या