fbpx

डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत अद्याप १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात असून बचावकार्य सुरु आहे.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून दिली जाणार आहे. तर हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत असलेल्या जखमींचा संपूर्ण खर्च हा सरकारतर्फे केला जाईल. अस देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. घटनास्थळी अद्याप बचावकार्य सुरु असून जखमींवर उपचार सुरु आहेत.