‘बारामतीच्या नेत्याचा मी बंदोबस्त करतो, त्याची तुम्ही काळजी करू नका’

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी इंदापूर येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी बारामतीच्या नेत्याचा मी बंदोबस्त करतो, त्याची तुम्ही काळजी करू नका असं विधान केले आहे.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यात मागील पाच वर्षांत झालेली कामे केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पावसाळ्यात नेहमी एकीकडे पूरस्थिती, तर दुसरीकडे मोठा भाग कोरडा राहतो. यातून मार्ग काढण्यासाठी पुराचे पाणी सुकलेल्या भागात आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

त्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने कृष्णा- भीमा स्थिरीकरण योजना व्यापक केली जाईल. नीरा भीमा योजनेचा त्यात सहभाग करून इंदापूरच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढला जाईल असं विधान केले आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांना निवडून द्या आणि इंदापूरचा विकास माझ्याकडून घ्या असंही ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आल्यामुळे आता त्यांना कोणाचा सासुरवास राहिला नाही. बारामतीच्या नेत्याचा मी बंदोबस्त करतो, त्याची तुम्ही काळजी करू नका, इंदापूरमधील अनेक जण भाजपमध्ये प्रवेशास इच्छुक होते, पण हर्षवर्धन पाटील आमचा तुमच्यावरच डोळा होता असंही ते म्हणले आहेत.

दरम्यान, इंदापूरमधून भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांची लढत ही राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांच्याशी होत आहे. पाटील हे इंदापुरमधून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु जागावाटपात राष्ट्रवादीने ही जागा कॉंग्रेसला न सोडल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या 

Loading...

Loading...